
भोकर,गंगाधर पडवळे। तालुक्यातील महत्वाची व अटीतची समजली जात होती अशी सेवा सहकारी सोसायटी म्हणजे पिंपळढव. या निवडणुकीत एकूण दोन पॅनल नी भाग घेतला होता. तेरा सदस्यांच्या सोसायटीत तेरा पैकी बरा सदस्य निवडून आणत या पॅनल ने दणदणीत विजयश्री खेचून आणला. तर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी सर्वानुमते प्रल्हाद थावरा जाधव तर व्हाईस चेअरमन पदी रवींद्र राजेंन्ना करेवाड यांची निवड कारण्यात आली.


सदरील सोसायटी चे संचालक म्हणून नारायण महादू उटनूरवाड,जळाबा मानिका गायकवाड,व्यंकटेश शंकर चटलावार,देविदास रतन जाधव,माधवराव कोंडीबा जाधव,सौ.मीनाक्षी गंगाधर जाधव,सौ. शितल अनिल जाधव,सौ. शिंधुताई शिवप्रसाद जाधव,बळीराम नागोबा जंगेवाड, मारोती नागनाथ कोटूरवार यांची निवड करण्यात आली या पॅनल चे पॅनल प्रमुख म्हणून साहेबराव पाटील भोंबे यांची या विजया मागे महत्वाची भूमिका राहिली तर त्यांना विशेष मदत म्हूणन दिलीप परसराम जाधव,गजानन प्रेमलवाड,वसंत जाधव (माजी सरपंच ) यांनी काम केलं.


सदरील निवडणूक महाविकास आघाडी कडून लढवून विजय मिळविला तर काँग्रेस च्या एका बलाढ्य नेता तथा जी. प.नांदेड चे माजी सभापती यांच्या विरोधात जिंकल्याने येणाऱ्या जि.प.व प. स. निवडणूकासाठी ही नुवडणूक महत्वाची व नक्कीच परिणाम करणारी सध्यातरी समजली जात आसून येणारा काळच सांगेल अशी चर्चा परिसरात होत आहे.

