
नवीन नांदेड। पोलीस स्थापना दिनानिमित्त नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने कुसुमताई विद्यालय सिडको येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमीत्ताने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण चे पोलीस उप निरीक्षक आनंद बिचेवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के ए जोशी उप मुख्याध्यापिका सौ शशिकला बिरादार यांची उपस्थिती होती.


नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन च्या वतीने कुसुमताई उच्च व माध्यमिक विद्यालय,सिडको नांदेड येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या अडी अडचणी समजून घेऊन विविध प्रश्नांना उत्तरे दिली व संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी यु आर सावते, शेख निजाम गोडगावकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण चे पोलीस उप निरीक्षक बालाजी नरवटे, पोहेकॉ उध्दव भारती, पोकॉ चंद्रकांत बिरादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील शिक्षक व विध्यार्थी यांची उपस्थिती होती

