
कंधार, सचिन मोरे। गेल्या पन्नास वर्षापासून स्वकर्तुत्वावर केशवराव धोंडगे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्रात नेतृत्व केले. संपूर्ण विधानसभा लोकसभा गाजवणारे ते शेकाप चे निष्ठावंत नेते होते पक्षनिष्ठ कशी असावी ? हे त्यांच्याकडून शिकावे. सत्ता असो अथवा नसो त्यांनी सत्तेची पर्वा केली नाही.

सातत्याने विरोधी पक्षात राहून सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वयाच्या 102 व्या वर्षापर्यंत प्रयत्न केले.त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व हरवले असल्याचे भावनिक उद्गागार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

शे.का.प चे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ.केशवराव धोंडगे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. दि.07 जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी क्रांतीभवन बहाद्दरपूरा येथे जाऊन धोंडगे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या फोटोस पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली.

धोंडगे परिवारातील श्रीमती चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे. अॅड .मुक्तेश्वर धोंडगे, प्रा.पुरुषोत्तम धोंडगे, प्रा.चित्राताई लुंगारे यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी सावंत, संपादक संतोष पांडागळे संजय देशमुख, कंधार कॉग्रेस कमिटीचे ता अध्यक्ष बालाजी पांडागळे, युवा नेते स्वप्नील लुंगारे. माजी उप नगर अध्यक्ष मन्नान चौधरी, रामभाऊ बनसोडे, बाळासाहेब पवार, माधवराव भालेराव, नागोराव पा मोरे, सतीश देवकत्ते अॅड. बाबुराव पुलकुंडवार यांची उपस्थिती होती.

