Monday, February 6, 2023
Home महाराष्ट्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात -NNL

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई| मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर आमदार कदम सुदैवाने बचावले आहेत.

आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदार संघाचे आमदार असून, मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली.

या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. आमदार योगेश कदम याना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!