
व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर -NNL

नांदेड। दर्पण दिनाचे औचित्य साधत व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाहक श्रीशंतनू डोईफोडे यांच्या हस्ते पार पडला . मंचावर जेष्ठ संपादक राम शेवडीकर, संपादक संतोष पांडागळे, डाक कार्यालयाचे अधिकारी दिगंबर नारे, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, महानगराध्यक्ष गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन झाले. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि राजा माने प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना यांचे नियुक्ती पत्र देण्यात आली. यामध्ये विभागीय सदस्य प्रल्हाद इंगोले, राजेश्वर पालमकर, सचिन मोहिते तर जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रवक्ता अंकुश सोनसळे, उपाध्यक्ष श्रीधर हंबर्डे, उपाध्यक्ष रघुनाथ पोतरे, उपाध्यक्ष अजित पाटील, सरचिटणीस योगेश लाटकर, सह चिटणीस अमित कुमार कंटेवाड,
कोषाध्यक्ष जयपाल वाघमारे, कार्यवाहक आनंद शेवडीकर, कार्यवाहक तानाजी हुसे कर, संघटक अविनाश चमकुरे, संघटक मारुती सवंडकर, संघटक डिगा पाटील, प्रसिद्धीप्रमुख दीपक मठपती, श्रीराम मोटरगे, सदस्य शिवशरण वावळे, शरद वाघमारे, रमेश चिते, भगवान सूर्यवंशी,तुकाराम सावंत, सतीश वाघरे, राम गायकवाड आदींचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी केले.