लोहा। आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय नई दिल्ली या विभागाच्या देशव्यापी परीक्षेत शिवकुमार हणमंत पालिमकर हे उत्तीर्ण झाला असून त्यांनी देशांमध्ये ४१ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
लोह्यातील शिवकुमार हणमंत पालिमकर यांनी बीएस्सी ऍग्री ही पदवी संपादन केली त्यांनतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आरोग्य कुटुंब मंत्रालय दिल्लीच्या वतीने देश पातळीवर केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी परीक्षा झाली त्यात शिवकुमार याने देशात ४१ वा क्रमांक पटकाविला.
देऊळगाव हे मूळ गाव पण गेल्या अनेक वर्षा पासून पालिमकर कुटुंब लोह्यातमोंढा येथे वास्तव्याला आहे. या दैदिप्यमान यशात वडील हणमंत पलीमकर त्याची आई ह्याचे फार मोठे आहे.
केंद्रीय अन्नसुरक्षा अधिकारी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली येथे निवड झाल्या बद्दल लोह्यात शिवप्रतिष्ठान चे संस्थापक युवा कार्यकर्ते दीपक सचिन मुकदम, राहुल कोटलवर संदेश कोटलवार, पवन तेल्लवार, संदीप पाटील जाधव , कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त माधव सूर्यवंशी राहुल परगे व सर्व मित्र परिवार यांनी सत्कार व अभिनंदन केले जात आहे.