Saturday, January 28, 2023
Home भोकर संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा -NNL

संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा -NNL

by nandednewslive
0 comment

भोकर। येथील संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे आज (दि ०९ जाने) बाल आनंद नगरी मेळावा उत्साहात संपन्न झाला..

संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल ही अतिशय कमी वेळात नाव रुपाला आलेली इंग्रजी माध्यम शाळा असून या शाळेत खरी कमाई या उपक्रमांतर्गत बाल आनंद नगरी मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्याचे सुधांशू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाचालक रूपाली भास्कर जाधव, आनंदराव ढवळे चींचाळकर,प्राचार्य अनिल शितोळे, संस्थेचे कार्यवाह अभिजीत घुगे आदींची उपस्थित होती.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रभावामुळे मुलांच्या मनामध्ये जी अनामिक भीती तयार झाली होती ती दूर करण्यासाठी, मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव यावा तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता…

यामध्ये फनी गेम्स, खाऊ गल्ली, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे मौज मजा, मस्ती, धमाल करण्यात आली. चिमुकल्यानी विविध खाऊचे स्टॉल लावून खाऊची विक्री केले. विद्यार्थ्यांनी स्टॉल वर लावण्यात आलेल्या खाऊचा मनमुराद आनंद घेतला. या बालआनंद मेळाव्यासाठी प्राचार्य, अनिल शितोळे , गंगापुरे , सविता चिवटे, मनीषा नारलेवड, सोनू तोटेवड, मुस्कान शेख, सुनीता आणारे आदी शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रयत्न केले. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!