
उस्माननगर, माणिक भिसे। सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी पत्रकारांनी सातत्यानेच भरीव काम केले आहे. पत्रकार सामाजिक कार्याला न्याय देऊ शकतो, असे मत उस्माननगर पोलीस स्टेशन चे सपोनि पि.डी.भारती यांनी व्यक्त केले.


पोलीस स्टेशन उस्माननगरच्या वतीने रेजींग डे सप्ताहातील विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्यातील ६ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री.भारती बोलत होते. यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, देविदास डांगे, सुर्यकांत मालीपाटील, अमजदखान पठाण, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक आमिनशा फकीर, दत्ता पाटील घोरबांड, गंगाधर भिसे,काॅग्रेस पक्षाचे नरेश शिंदे, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.


पुढे सपोनि भारती म्हणाले की, पूर्वीपासून पत्रकारीता खडतर मार्गाची राहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शासनात काम करताना चांगले काम पत्रकारांमुळे समोर येते. सरकारी योजना लोकार्पयत पोहचविण्यास व समाजाच्या मनात जागृती होण्यासाठी पत्रकाराची कायमच मदत होते. यावेळी दर्पन दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार बांधवांचा पेन देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकारांचा सन्मान उस्माननगर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार सभागृहात सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड यांच्या वतीने पेन, पुष्पहार देऊन पत्रकारांचा सत्कार करून सन्मान केला.यावेळी आमिनशा फकीर,नरेश शिंदे, गंगाधर भिसे ,तेजस भिसे , यांनी सुध्दा पत्रकारांचा पेन देऊन सन्मान केला.

समाजात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. लोकशाही टिकविण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. समाज परिवर्तनामध्ये काम करणारे सर्वात मोठे समाज कार्यकर्ते म्हणजे पत्रकार समाज विकासासाठी काम करणारेपण पत्रकारच आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची भूमिका आहे. सरकारी ध्येय धोरणे तरतात. ती माणसाच्या समाज विकासाच्या अनुषंगाने असावे ही तळागाळात माहिती सरकारला पोहचण्याचे काम पत्रकार करतात. मानवी जीवनात बदल घडवणारा हा
पत्रकार आहे. पत्रकारिता माणसांच्या जीवनाशी निगडीत व्यवसाय आहे. पत्रकारितेत कौशल्यासोबत मुल्य गरजेचे आहे.

सध्याच्या परिस्थितीत जर कोणी परिवर्तन घडवून आणणार असेल तर तो पत्रकार असल्याची ठाम भूमिका असल्याचे सांगितले. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जोनेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पत्रकार संघाकडून गावातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, सरपंच, पोलीस निरीक्षक, यांच्यासह व्हाॅटस्पवर ज्यांनी ज्यांनी दर्पन दिनाच्या शुभेच्छा दिल्या ,त्या सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
