
भोकर,गंगाधर पडवळे। भोकर उमरी रस्त्यावरील मौजे हळदा येथे ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून दूचाकी धडकल्याने दोन दूचाकी स्वरांचा जागीच मृत्यू झाला आहे.


रामा नरसप्पा पटपेवाड (७२) रा. पवना ता. हिमायतनगर हे आपला नातू हर्षवर्धन चंद्रकांत दंतुलवाड (२१)रा. चिंचळा ता. बिलोली ह. मु.पवना हे दोघे दि.६ जानेवारी २०२३ रोजी उमरी येथील एका नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून त्यांची दूचाकी क्र. MH २६ CC ९७६७ वरून गावी पावना येथे परत जात असताना भोकर उमरी रस्त्यावरील हळदा ता. भोकर येथे रात्री ०७:३०च्या दरम्यान त्यांची दूचाकी ट्रॅकटर क्र. MH २६ BQ०७५०च्या ट्रॉली ला पाठीमागून धडकली.


यावेळी हळदा येथील काही नागरिकांनी तात्काळ सेवा ऍम्ब्युलन्स १०८ला याबाबत माहिती कळवली असता कर्तव्यावर असलेले भोकर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गणेश जंगीलावाड व चालक रवी वाठोरे हे ऍम्ब्युलन्स घेऊन अवघ्या १०मिनिटात पोहचेल परंतु घटनास्थळी दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचाजागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांच्या निदर्शनास आले .


हि माहीती भोकर पोलीस व महामार्ग पोलिसांना समजली यावरून भोकर पोलीस ठाण्याचे पो. उप. नि.अनिल कांबळे, महिला पो. उप. नि.राणी भोंडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर नागरगोजे जमादार संभाजी देवकांबळे,पो. का.सय्यद मोईन, पोलीस मित्र मन्सूर पठाण, जुनेद पटेल,हे घटनास्थळी पोहचले तसेच महामार्ग पोलीस बारड चे जमादार संतोष निलेवार,पो. का. बालाजी हिंगणकर, चालक पो. का. विशाल ठाकूर घटनास्थळी पोहचले पोलीस मित्र व नागरिकांच्या मदतीने दुचाकीस्वार मयातांचे मृतदेह उत्तरीय तापसनी साठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणले असून ट्रकटर व ट्रॉली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर रात्री उशिरा पर्यंत भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
