
नांदेड। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर कुसुम सभागृह येथे दि ५ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान जल्लोषात संपन्न झाली. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ८ बाल नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.


स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राजाराम काकांनी सहकार विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज, धर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित, श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित “पिकवलेली फळे” प्रियदर्शिनी विद्या संकुल, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, भीमाशंकर दिग्दर्शित “मिसिंग” , ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,राहुल जोंधळे दिग्दर्शित “पडसाद”, नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, दिग्दर्शित “सक्सेस अॅप”, या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.


तर स्पर्धेच्या दुसर्या दिवशी, गोपाला फाऊंडेशन परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, रवी पाठक दिग्दर्शित “जाईच्या कळ्या”, ज्ञान भारती विद्या मंदिर, नांदेडच्या वतीने दीपक सोनकांबळे लिखित, राधा पवार दिग्दर्शित “आस” केंब्रिज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मनीषा उमरीकर दिग्दर्शित “लक्षप्रश्न” या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले.


लहान लहान बाल कलावंतानी अत्यंत सरस आणि निरागस अभिनय करत बालनाट्य स्पर्धेचा उद्देश सफल केला. या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनीही चांगल्या संख्येत उपस्थिती दर्शून बाल कलावंताना प्रोत्साहन दिले. स्थानिक संस्थांनी ज्ञान भारती विद्यामंदिर, संस्कार वर्धिनी प्राथमिक शाळा, ना.वा. मनपा प्राथमिक शाळा, वजिराबाद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठा, फुलोरा नंदनवन इंग्लिश स्कूल, संस्कार वर्धिनी प्राथमिक शाळा यांनी आप आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बालनाट्याचा रसास्वाद घेण्यासाठी सभागृहात घेऊन आले. व बालरंगभूमीला समृद्ध करण्यासाठी योगदान दिले.

या स्पर्धेस परीक्षक म्हणून सुहास जोशी – पुणे, वैशाली पाटील- जळगांव, राजेश जाधव – सोलापूर यांनी काम पाहिले दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा निकाल बीड केंद्रवील स्पर्धां संपन्न झाल्यावर एकत्रित घोषित होणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक दिनेश कवडे, सह समन्वयक सुधांशू सामलेट्टी, गौतम गायकवाड, किरण टाकळे कवडे आणि स्थानिक रंगकर्मीनि काम पाहिले.
