
पुणे, दीपक बिडकर| भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित कुचीपुडी या एकल नृत्य कार्यक्रमाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.


शनीवार, ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हे नृत्य सादरीकरण झाले.परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटर च्या प्रस्तुत या कार्यक्रमात कासी आयसोला (अमेरिका) यांनी बहारदार एकल नृत्य सादर केले.


हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४९ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कासी आयसोला यांचा सत्कार केला.


कासी यांनी पारंपारिक रचनांवर नृत्य प्रस्तुती केली आणि रसिक भारावून गेले.’जयमू, जयमू ‘… या नटराज नृत्याने प्रारंभ झाला. हंस ध्वनी रागाच्या संगीत पार्श्वभूमीवर हे बहारदार नृत्य सादर झाले. कालीया नागावरील ‘तरंगम्’ कृष्ण नृत्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जावली नृत्य, गोपी संवाद, आणि तिल्लाना सादर करुन त्यांनी मने जिंकली.डॉ. परिमल फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
