
अर्धापूर| पौष पौर्णिमा दि. ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे पू. भदन्त धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ३६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परीषदेचे उपासक उपसिकांच्या उच्चांकी संख्येत व हर्ष उल्हासात समारोप झाला.


या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत उद्घाटक म्हणून श्रीलंकेतील विद्यमान खासदार व पू. भदंत अतुरलिय रतन थेरो व त्यांच्या समवेत आलेल्या श्रीलंकेच्या २२ भिक्खुची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की डॉ बाबासाहेबांमुळेच भारतात बौद्ध धम्मा पुनरुत्जीवीत झाला. पुढील बुद्ध हे बाबासाहेबच असतील, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले.


या वेळी “साऊथ एशियन बुद्धिस्ट फोरम” ची स्थापना झाल्याची घोषणा पू. भदंत अतुरलिय रतन थेरो यांनी केली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण उपस्थित होते. परिषदेस संबोधताना ते म्हणाले की, मी नेहमीच बावरी नगर सोबत आहे. भविष्यातही कुठलीही जवाबदारी आल्यास ती पूर्ण करण्यात कुठलीही कसर सोडणार नाही. बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थविर यांनी अध्यक्षीय समरोपात बौद्ध धम्मातिल प्रज्ञा बल व श्रद्धाबलाविषयी विवेचन केले.


धम्म देसनेत प्रामुख्याने भिक्खु डॉ. खेमधम्मो महाथेरो, कंबोडियाचे भिक्खु बा डाविटो, भिक्खु पन्न्यारत्न, भिक्खु ज्ञानरक्षित थेरो, भिक्खु करूणांनंद थेरो, इत्यादी भिक्खुंची धम्म देसणा झाली. या धम्मपरिषदेचे आयोजन महाउपासक डॉ एस पी गायकवाड यांनी केले होते. सकाळी ६ वाजेपर्यन्त चाललेल्या या धम्म परिषदेत एकूण २६ विविध ठराव पारीत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. मिलिंद वि. भालेराव यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा बी एम वाघमारे यांनी केले. परिषदेची सांगता राष्ट्गीताने झाली.
