
कंधार| फुलवळ येथील रहिवासी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा दै.वतनवाला वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक दत्तात्रय शेंबाळे यांच्या मातोश्री त्रिवेणीबाई तुळशीराम शेंबाळे वय ७५ वर्ष रा. फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांच्यावर काल दि.७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजता फुलवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


दत्ता शेंबाळे यांच्या मातोश्री त्रिवेणीबाई तुळशीराम शेंबाळे वय ७५ वर्ष यांचे दि.६ जानेवारी २०२३ रोज शुक्रवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पती सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी तुळशीराम शेंबाळे, मुलगा दत्तात्रय शेंबाळे, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे.


त्रिवेणी शेंबाळे यांच्या अंत्यसंस्कारास माजी आमदार रोहीदास चव्हाण, वंचित चे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, कंधार तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवारे, राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर, बसव ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष डॉ. व्यंकटेश कुराडे, शहराध्यक्ष पिंटू बोंबले ,बसव ब्रिगेड व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुराडे, राजु बोंबलें बांधकाम विभाग शाखा अभियंता एम.एन .डांगे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते संजय मंगनाळे, शिक्षक नेते बाबुराव फसमले, दत्तात्रय मंगनाळे, बाळू डांगे ,शिवहार मठपती वतनवाला चे जिल्हा प्रतिनिधी देविदास डांगे, पत्रकार महम्मद सिकंदर ,हरिहर विश्वासराव,श्रीधर विश्वास राव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणेराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नातलग व फुलवळ ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

