
नविन नांदेड। बातमी संकलन करून नेहमीच सदैव तत्पर राहणा-या पत्रकारांच्या गौरव करणे हे आपले कर्तव्य असल्याचे युवा नेते राजू लांडगे यांनी आयोजित सत्कार सोहळा प्रसंगी केले.


दर्पण दिनानिमित्त सिडको परिसरातील पत्रकारांचा युवा नेते राजू लांडगे व पंजाबराव देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको भागातील बेरजे यांच्या निवासस्थानी ६ जानेवारी रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


दर्पण दिनानिमित्त सिडको परिसरातील पत्रकार रमेश ठाकूर,शाम जाधव, अनिल धमणे,दिंगाबर शिंदे, संभाजी सोनकांबळे यांच्या सह विविध दैनिकांच्या पत्रकाराचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु लांडगे यांनी तर सूत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले.यावेळी भि.ना. गायकवाड, विलास गजभारे,अनिल बेरजे,बि.डी.कांबळे,प्रदीप हानवंते, कांबळे, यांच्या सह मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

