
नविन नांदेड। शालेय विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासक्रम मध्ये लिखाणाला महत्व द्यावे व आई वडील नमस्कार करून सेवा करावी व भ्रमधवनीचा वापर कमी करावा व ईतर पोलीस विषयी माहिती देतांना ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे पोलीस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थी यांना माहिती देत असतांना बोलत होते.


पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सप्ताह अंतर्गत शिवाजी महाविद्यालय सिडको येथील वर्ग आठवा व नववा वर्गातील मुला मुलींनी पोलीस स्टेशन येथे भेट देऊन पोलीस वापरत असलेल्या शस्त्राविषयी , दैनंदिन आँनलाईन पोलीस कामकाज विषयी, जप्त मुद्देमाल, बिनतारी संदेश विभाग, लेखनिक व क्राईम विभागासह ईतर माहिती घेतली व ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याशी सुसंवाद साधला.


यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी शालेय जिवनातील आठवणी व गुरूजंनाचा आदर या बाबत सुसंवाद साधून दैनंदिन शालेय अभ्यासक्रमात लिखाणाला महत्व द्यावे व आई वडीलांची सेवा करून नमस्कार करावा असे सांगून अभ्यासक्रम बाबत व पोलीस स्टेशन विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपनिरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक ज्ञानेशवर मठवाड गोपनीय शाखेचे बालाजी दंतापले, चंद्रकांत बिरादार यांच्या सह शिक्षक भोसिकर एस.आर.यांची उपस्थिती होती.

