
उस्माननगर। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त उस्माननगर पोलीस स्टेशनच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना सपोनि पी.डी.भारती व पोलीस कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी पोलीस स्टेशन उस्माननगर चे सपोनि भारती यांनी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक तथा संकुलाचे केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, सोनकांबळे, पांडागळे, सुर्यवंशी, यांच्या सह उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


त्यानंतर पोलिस स्टेशन मधील प्रत्येक विभागाची माहिती सपोनि भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काॅ.मुंडे,जमदार पवार यांनी सखोलपणे माहिती सांगितली.यामध्ये रायफल, बंदूक, वायरलेस, एफ आर, गोळ्या , यांच्या सह अनेक विभागाची माहिती दिली.


जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील मुख्याध्यापक जयवंतराव काळे, गौतम सोनकांबळे पांडागळे, सुर्यवंशी, खांन,केंद्रे यांचा पोलीस स्टेशन चर्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थी विद्यार्थिनींनी माहीतीचे ज्ञान घेतले.
