
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे लोंढेसांगवी ता.लोहा येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदराव गोविंदराव लोंढे यांच्या पुढाकारातून गरजू लाभार्थ्यांनसाठी घेण्यात आलेल्या भव्य डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप आणि बाल आरोग्य शिबीरास लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.


लोंढेसांगवी ता.लोहा येथे अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने सदरील शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात उच्च सुशिक्षित आनंदराव लोंढे यांनी टायटन आय.पल्स कला मंदिर, नांदेड चे डाॅ.नागेश पांडागळे ( बालरोग तज्ज्ञ ) पांडुरंग गादेवार ( टायटन आय पल्स) केले होते.गावातील जवळपास पाचशेच्या वर रूग्णांनी तपासणी करून लाभ घेतला.यामध्ये दोनशे पन्नास लाभार्थी रूग्णांना मोफत चष्मे , आणि २५ रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन सुध्दा मोफत करण्यात येणार आहे.


सदरील शिबीरास आनंदराव लोंढे ( सामाजिक कार्यकर्ते तथा सात बारा कृषी केद्र ) ,प्रमोद लोंढे , संदीप गवळे , भिमराव गवळे ,किर्तीरत्न सावळे , शंकरराव श्यामराव लोंढे ,राम लोंढे , यांनी परिश्रम घेतले.आयोजक सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांनी गावातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी तन मनाने पुढे येऊन सामाजिक कार्याचा ध्यास मनी घेऊन शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.यामध्ये शिवारात कॅनोला पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करणे , शेतकऱ्यांना पिककर्ज, गोरगरिब, वयोवृद्ध,दिव्यांग, विधवा, यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांसाठी पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे .


अनेकांना लाभ देखील मिळवून दिला आहे.त्याचबरोबर गावातील सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन हातभार लावणे , शासनाच्या कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीविषयक किटकनाशके औषधे,खत,बि बियाणे, पुरविणे व वेळोवेळी मार्गदर्शन करणे . सामाजिक भावनेतून करण्यात येत असलेल्या समाजसेवेला अनेक ठिकाणच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मित्र मंडळ, बांधवांची मदत मिळत असते.आनंद लोंढे यांच्या सामाजिक कार्याची सर्वस्तरातू कौतुक होत असून यापुढे ही समाज सेवेसाठी विधेयक उपक्रम राबवून समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून कामे करण्यात येणार असल्याचे मत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
