
अर्धापूर| आजचा युगात विद्यार्थ्यांनी चौकस राहून आपले शिक्षण घेतले पाहिजे कारण आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे प्रत्येकाला चौकस राहून आपलं शिक्षण घेऊन जीवनाचे यशस्वी वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन संजय देशमुख लहानकर यांनी केली ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलत होते.


याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हासचिव नीळकंठराव मदने, जिल्हा परिषद प्रा.शाळा रोडगीचे मु.अ. राजाराम राठोड, सरपंच दगडू काकडे, नामदेव दुधाटे,लक्ष्मीकांत मुळे, पंढरीनाथ क्षीरसागर,यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा गांधी व जलसंस्कृतीचे जनक कै.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. पुढे बोलताना संजय देशमुख म्हणाले की,कै. शंकररावजी चव्हाण यांनी अनेकांचा विरोध पत्कारून नांदेड व मराठवाड्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला.


त्यांच्याच पुण्याईने अर्धापूर परिसर हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अशोकरावजी चव्हाण यांनी अर्धापूर येथे शंकरराव चव्हाण महाविद्यालय व शारदा भवन हायस्कूलची उभारणी केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली. विद्यार्थिनी या संधीचं सोनं करावं असं ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील यांनी अध्यक्ष समारोपात करताना म्हणाले की श्री शारदा भवन शिक्षण संस्था व शंकरराव चव्हाण महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थी हिताचे धोरण महाविद्यालयामध्ये राबवित आहे असे ते म्हणाले.


याप्रसंगी विद्यार्थ्यांना निळकंठ मदने यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी स्पर्धा करावी व शिक्षणाच्या संधीचे सोने करावे असे म्हणाले. या प्रसंगी अर्धापूर तालुक्यातील यावेळी रामराव भालेराव, डिगांबर मोळके, गुणवंत वीरकर, सखाराम क्षीरसागर, ओमप्रकाश पत्रे,फिरदोस हुसैनी, उध्दवराव सरोदे,ख शकील, अनिल मोळके, छगन इंगळे, संदीप राऊत, आनंद मोरे शंकर ढगे,शेख मौला या पत्रकार मंडळींचा सत्कार करण्यात आला.

त्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये या शिबिरात सहभागी झालेले सर्व स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी तथा संयोजक प्रा.डाॅ.रघुनाथ शेटे यांनी केले सुत्रसंचालन डाॅ.सोमनाथ बिराजदार व डाॅ.काझी एम.के. यांनी केले. कार्यक्रमास दत्तराम काकडे,विजय काकडे, राजू सीतापुर हे ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे बी.के.गायकवाड, डाॅ.विक्रम कुंटूरवार, डॉ.काझी मुख्तारोद्दिन देळुबकर, कार्यक्रमाधिकारी डाॅ.रघुनाथ शेटे, डॉ.सोमनाथ बिराजदार यांच्यासह राष्ट्रीय स्वयं राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
