
नवीन नांदेड। ग्रंथालय संचालनालय मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने नांदेड ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोदावरी पब्लिक स्कूल सिडको येथील विद्यार्थी प्रताप दिगंबर शिंदे व प्रणिती दिगंबर शिंदे यांनी सहभाग घेत प्रशस्तीपत्र पटकाविले आहे.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. गंगाधर पटणे यांच्या स्वाक्षरीने शिंदे भावंडांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. याबद्दल गोदावरी पब्लिक स्कूल सिडको येथे शाळेच्या मैदानात दि. ९ जानेवारी रोजी कुसुमताई विद्यालय मुख्याध्यापक कमलाकर जोशी, उप मुख्याध्यापक शेख निजाम गवंडगांवकर, पर्यवेक्षक संजय चाटे, व्हि. डी. बिरादार , संजय आलेवाड, गोदावरी पब्लिक स्कूलचे प्राचार्य गोविंद तोरणे यांच्या हस्ते प्रताप व प्रणिती शिंदे भावंडांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

