
नांदेड। फुलवळ येथील रहिवासी तथा वीर शैव समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दैनिक वतनवालाचे कार्यकारी संपादक दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या मातोश्री त्रिवेणी बाई तुळशीराम शेंबाळे यांचे सात जानेवारी रोजी अचानक निधन झाले हे निधनाची बातमी करतात संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त झाली होती.


त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यांचे सांत्वन करण्यासाठी श्री श्री श्री 1008 हिमवंत केदार पिठाचे जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महाराज स्वामीजी यांनी दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या फुलवळ येथील निवासस्थानी जाऊन विचारपूस केली व या दु:कातून सावरण्यासाठी आशीर्वाद दिला त्यांच्या समवेत माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे राजकुमार स्वामी नारायणराव मंगनाळे आदींनी देखील दत्ता शेंबाळे यांचे सांत्वन केले.


नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही दत्ताभाऊ शेवाळे यांचे त्यांच्या निवास निवासस्थानी जाऊन सांत्वन केले ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली येथे होते त्यामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित राहू शकलो नाही यांची खंत देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवली त्यांच्या समवेत कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जपरुद्दीन बाबुराव केंद्रे यांच्यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

