Tuesday, February 7, 2023
Home लोहा मोबाईल मुळे वाचन संस्कृती धोक्यात -शिवश्री रमेश पवार -NNL

मोबाईल मुळे वाचन संस्कृती धोक्यात -शिवश्री रमेश पवार -NNL

by nandednewslive
0 comment

लोहा| राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.बदलल्या काळात वाचन संस्कृती आता कमी होते आहे हे धोकादायक आहे. मोबाईलमुळे वाचना पासून आपण दूर जात आहोत अशी भीती व्यक्त करत शिवश्री रमेश पवार यांनी पुस्तक हेच मस्तक घडवू शकतात असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयात सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव महाराष्ट्राच्या लेकीचा गौरव कर्तृत्ववान मातेचा हा कार्यक्रम राबविण्यात येतो. गेल्या सात वर्षा पासून संस्थापक वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात येत आहे

स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ बहि:शालाचे वक्ते शिवश्री रमेश पवार यांनी जिजाऊ जन्मोत्सव महोत्सव २०२३ मध्ये दुसरे पुष्प गुंफले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे होते प्रमुख पाहुणे जिजामाता शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, डॉ याउप्रा शाळेचे मुख्याध्यापक सुल्तानखान , सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण यांनी उपस्थिती होती.

व्याख्याते रमेश पवार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देताना आजच्या बदलत्या काळात महिलांच्या समोर मोठे आव्हान आहे.पुस्तक मस्तक घडविते .विद्ववता घडते लेखणीमुळे जीवन समृद्ध होते. असा उपदेश विद्यार्थ्यांना शिक्षक रमेश पवार यांनी केल अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केले सात वर्षा पासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा करताना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री वडजे यांनी दिली.

banner

प्रास्ताविक एच जी पवार यांनी केले तर प्रमुख वक्ते यांचा परिचय आर आर पिठ्ठलवाड यांनी केला. दिलीप काहलेकर, शेख शब्बीर, एस ई पवार, व्ही एस गुद्धे, आर आर पारेकर, एस आर शेटे, श्रीमती आढाव, सौ मीना काळकेकर , फेरोजखान, अहमद अखिल , निखत बेगम, शेख फतरु , विठ्ठल वडजे, व्यंकट पवार,श्रीमती शेडगे, श्रीमती खरात यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!