
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल व भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई अंतर्गत असलेल्या सोसायटी फॉर मटेरियल केमिस्ट्री विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.११ ते १३जानेवारी दरम्यान ‘अपारंपारिक ऊर्जा’ या विषयावरआंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची घोषणा दोन वर्षांपूर्वी केली होती. परंतु कोरोना प्रादुर्भावच्या परिस्थितीमुळे ही परिषद या वर्षी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रो. बी.बी.काळे आणि प्रमुख उपस्थिती माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे राहणार आहेत.


या परिषदेमध्ये डॉ. जिया कायजम (चीन), डॉ.जोअस राजम (मलेशिया), डॉ. शेख शोएब (सौदी अरेबिया), डॉ. रोहन अंबाडे (द. कोरिया) तसेच डॉ. नरसिन्हुलू सांकी (हैदराबाद), डॉ. ईश्वरमूर्ती रामास्वामी (हैदराबाद), डॉ. प्रभाकर चेट्टी(दिल्ली), डॉ. आदिनाथ फुंदे (पुणे), प्रो.महेंद्र शिरसाट (औरंगाबाद), प्रो. अजय चौधरी (मुंबई), डॉ. अभिमन्यू राणा (दिल्ली),डॉ. डिंपल दत्ता (बीआरसी मुंबई), डॉ. प्रशांत आलेगावकर (पंजाब), डॉ.शिवाजी सदाले (कोल्हापूर), डॉ. सरताले एस. डी. (पुणे), डॉ. अनिल घुले (पुणे),डॉ. राहुल साळुंखे (जम्मू) आणि डॉ. रणजीत हवालदार (पुणे) हे विद्यार्थ्यांना अपारंपारिक ऊर्जा संशोधनासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.


या परिषदेमध्ये देशाच्या विविध भागातून जवळपास २०० विद्यार्थी सहभागी होणार असून ते आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. या परिषदेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या परिषदेचे आयोजक डॉ. अरविंद सरोदे, नवोपक्रम नवसंशोधन सहचर्य विभागाचे संचालक व संयोजक डॉ. राजाराम माने, भौतिकशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. मेघा महाबोले तसेच प्रा.डॉ.अशोक कुंभारखाने, प्रा.डॉ. एम. के. पाटील व डॉ. काशिनाथ बोगले यांनी केले आहे.
