
लोहा| जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांचे वडील कै भीमराव किशनराव पाटील कऱ्हाळे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने अंतेश्वर (ता लोहा) येथे १२ जानेवारी रोज गुरुवारी प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भागात दहा वर्षा नंतर ढोक महाराज यांचे कीर्तन होत आहे. याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अस आवाहन कऱ्हाले पाटील कुटुंबियांनी केले आहे.


अंतेश्वर व परिसरातील मोठे प्रस्थ व सधन शेतकरी कै. भिमराव किशनराव पाटील कऱ्हाळे यांच्या चौविसाव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुवारी १२ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. रामायणाचार्य श्री ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांचे हरिकिर्तन सकाळी १० ते १२ होणार आहे. त्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


तेव्हा मोठ्या संख्येने या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन रावण पाटील क-हाळे , गणपती. पाटील क-हाळे , प्रकाश पाटील क-हाळे , बालाजी पाटील क-हाळे, माजी सरपंच मधुकर पाटील क-हाळे, माजी न प बांधकाम सभापती शंकर पाटील क-हाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी केले आहे.

