नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शाळा न शिकणारे आडाणी आई वडील जेव्हा म्हणतात शाळेत गेलतास का !, अभ्यास केलास का ! हा अंतर भावातील पाट वर्गातील शिकविणी पेक्षा प्रचंड उर्जा भरलेला असतो तोच पाट आमचे जिवण बदलून टाकतो.तश्या आई-वडीलांचे तुम्ही सन्मानपूर्वक पालन पोषण करा तरच तुम्हाला ईश्वर सेवा घडते असे भावोद्गार शिव कीर्तनकार मन्मथ अप्पा डांगे गुरूजी यांनी कीर्तना दरम्यान काढले.
टाकळी (बु) ता.नायगाव येथील लक्ष्मीबाई माधवराव चोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित केलेल्या शिवकीर्तन सेवेत ते म्हणाले माणसाला हा सुंदर नरदेह प्राप्त झाला.लाख मोलाचे आयुष्य मिळाले ते संपणार आहे ,मिळालेल्या आयुष्यात चांगले काम करा.मृत्याचे भय वाटण्याचे कारण काय? सेवावृत्ती अंगीकारा आई वडिलांची सेवा करा तुमचे जिवन धन्य होईल.
शिवा कर्मचारी महासंघाचे प्रमुख व शिक्षक नेते निळकंठराव माधवराव चोंडे यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले या वेळी त्यांनी आठवणीना उजाळा दिला व पुण्यतिथी निमित्त गुरूवर्य सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर , शिवकीर्तनकार मन्मथ अप्पा डांगे, विकास भुरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक पाटील, बालाजी भेलोंडे, शिक्षकांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले गुरूवर्यांच्या अमृतउपदेशा तद्नंतर कीर्तन सेवा पार पडली. यावेळी शिवम मरशिवणे, अशोक पवळे,उपसरपंच प्रतिनिधी ओमप्रकाश चोंडे, बाबुराव भेलोंडे, बालाजी भुरे, शिवाजी पोतले, गोविंद पाटील बिजुरकर,बाबु महाराज टाकळीकर, गंगाधर मलकापूरकर, गजानन मुगावकर, व्यंकटराव तांबोळी, मारोती पांचाळ, गणेश चोंडे, यांच्या सह अनेक मंडळी उपस्थित होती.