
नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या गावातील उपसरपंच पदासाठी दि.९ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत मार्कंड येथे ऊपसंरपच पदासाठी आकाश येवले हे बिनविरोध तर बळीरामपुर येथे निवडणूक होऊन नागेश वाघमारे तर सिध्दनाथा येथे स्नेहा एकनाथ पाटील व किसनाबाई आवातिरीक यांना समान चार मते पडल्याने संरपच यांच्या निर्णायक मतदाना नंतर स्नेहा पाटील विजयी झाल्या.


तर पांगरी येथे रेणुका माधवराव पांगरेकर या विजयी झाल्या आहेत,या चार गावाचा ग्रामपंचायत कार्यालयाचा थेट जनतेतुन संरपच म्हणून निवडून आलेल्या संरपच यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या सभेत ऊपसंरपच पदाची निवडणूक घेण्यात आली,यानिवडणुकी साठी पंचायत समितीचे संपर्क अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यी नियुक्ती करण्यात आली होती तर पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


प्रांरभी सकाळी थेट जनतेतुन निवडणून आलेल्या संरपच मार्कंड सौ. नेहा बालाजी शिंदे,बळीरामपुर रेणुका इंद्रजित पांचाळ शिंदे , पांगरी निलावती भिमराव घोगरे , सिध्दानाथ येथे सटवाजी शामराव तारू यांच्या अध्यक्षतेखाली ऊपसंरपच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात मार्कंड येथे ऊपसंरपच पदासाठी एकमेव आकाश येवले यांच्या अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली तर, पांगरी येथे ऊपसंरपच पदासाठी रेणुका माधवराव पांगरीकर यांना ६ तर मते पडली, यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले.


सिध्दनाथ येथे ऊपसंरपच पदासाठी स्नेहा एकनाथ पाटील व किशनाबाई दता आवातिरक यांना प्रत्येकी चार मते पडल्याने उपसरपंच पदासाठी संरपच यांच्ये निर्णायक मतदान झाल्या नंतर स्नेहा पाटील विजयी झाल्या, तालुक्यातील मोठ्या असलेल्या बळीरामपुर ग्रामपंचायत साठी दोन उमेदवार निवडून रिंगणात उभे होते यावेळी मतदान प्रक्रिया घेण्यात आली यावेळी नागेश वाघमारे ११ तर विरोधी कपील सोनकांबळे यांना ७ मते पडली.

पांगरी येथे संपर्क अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समितीच्या सौ.सि.डी.देशमुख व ग्रामसेवक बालासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर सिध्दनाथ येथे विस्तार अधिकारी सौ.धोडे पि.वाय, ग्रामविकास अधिकारी पि.डब्लु.भदरगे मार्कंड येथे विस्तार अधिकारी आरोग्य गिते एस.व्हि,तर बळीरामपुर साठी विस्तार अधिकारी सांख्येकी संजय मेडपलवार ,व ग्रामसेवक वाघमारे,कर्मचारी यांच्या ऊपस्थीती होती.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कोरे,ऊतम बुकतरे,ज्ञानेशवर मठवाड, झुंजारे,व अंमलदार शिवानंद कानगुले,गव्हाणकर,कोडांवार,वांगीकर, बालाजी लाडेकर , सुनिल गटलेवार,धुळगुंडे,घोणशेटवार, स्वामी,लाडेकर, भोपाळकर, केद्रे, पोलीस अंमलदार कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नवनिर्वाचित ऊपसंरपच नागेश वाघमारे यांच्ये नांदेड तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुडीले, नगरसेवक संदीप सोनकांबळे,सुभाष रायभोळे, धनेगाव संरपच पिंटू पाटील शिंदे, माजी सरपंच दिलीप गजभारे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले तर , चार ही ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित संरपच ऊपसंरपच, सदस्य यांच्ये स्वागत प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी केले आहे.