
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्षभर श्रामणेर दीक्षा देण्याचा कार्यक्रम चालतो. तसेच ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दर महिन्याला पौर्णिमेचे औचित्य साधून दस दिवशीय शिबिराचे आयोजनही करण्यात येते.


अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघरत्न, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुनंद, भंते सुयश , भंते सुगत, भंते सुजात आदींची उपस्थिती होती. पौष पौर्णिमेचे औचित्य साधून हट्टा येथील दहा जणांना खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाच्या हस्ते विधीवत श्रामणेर दीक्षा देण्यात आली.


त्यात शेषराव खाडे ( संघकिर्ती), रावसाहेब ढगे (संघजित), किरण खाडे ( संघविरीयो), राहुल खिल्लारे (सुदस्सी), उत्तम खाडे (संघांश), श्रावण खिल्लारे ( संघपाल), दत्ता खाडे (सुगत), भीमराव खाडे (सुगततिस्स), शंकर टेकुळे ( सुमित), दलित खाडे (सुप्रिय) यांचा समावेश आहे. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी चिवर धारण केले. तसेच त्यांचे बौद्ध पद्धतीने नामकरण करण्यात आले. आता हे शिबिर दहा दिवस चालणार असून २० रोजी शिबिराचा समारोप होणार आहे.

