नायगाव, रामप्रसाद चन्नावार। गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती मंडळ , नरसी कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी येथील जेष्ठ पत्रकार गंगाधर गंगासागरे यांची सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे .
क्रांतीकारी महामानव विज्ञानवादी विचारवंत जगतगुरु गुरु रविदास महाराज यांची ६२५ वी जयंती गुरु रविदास मंदीर प्रेरणा केंद्र , नरसी (ता.नायगांव ) जि. नांदेड या स्थळावर दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ (रविवार) या दिवसी साजरी करण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने काल दिनांक ७ जानेवारी रोजी (शनिवारी ) येथील समाजबांधवांची महत्वपुर्ण बैठक जमनाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येवून पुढीलप्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी गंगाधर गंगासागरे (पत्रकार) , सचिव माधव गंगासागरे , कोषाध्यक्ष हाणमंत गंगासागरे , उपाध्यक्ष आनंदा बरबडे , धोंडीबा कांबळे , सहसचिव संतोष कांबळे , कार्याध्यक्ष व्यंकट गंगासागरे , अशोक गंगासागरे , संघटक बालाजी बरबडे , सुरेश कांबळे , शैलेश गंगासागरे , सदस्य बाबूराव गंगासागरे , रोहीत गंगासागरे यांची निवड जाहीर केली .
या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक दिगांबर गंगासागरे , गंगाराम गंगासागरे, जमनाजी कांबळे, आनंदा गंगासागरे , गिरजाजी गंगासागरे यांसह गजानन गंगासागरे , अजय कांबळे , शंकर बरबडे, त्रषीकेश बरबडे, अविनाश कांबळे, प्रमोद कांबळे, पांडुरंग गंगासागरे, साईनाथ गंगासागरे, सुरेश कांबळे आदींची उपस्थीती होती .