
पुणे,दीपक बिडकर| भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२३’ चे उद्घाटन दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी आयएमईडी सेमिनार हॉल (एरंडवणे, पौड रस्ता) येथे झाले.


भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप,भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या उपस्थितीत झाले . आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन देखील डॉ. अस्मिता जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्राचार्या उज्वला बेंडाळे,प्राचार्य विवेक रणखांबे, उपप्राचार्य सदाशिव पाटील,प्राचार्य आत्माराम पवार उपस्थित होते.एकूण १३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.डॉ.प्रमोद पवार यांनी आभार मानले.


मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नेहा दुर्गाडे,नुहा हॅरिस यांना विभागून देण्यात आले.द्वितीय पारितोषिक टीना झबक,दृष्टी भांडे यांना विभागून देण्यात आले. तृतीय पारितोषिक सिलबी साजू,वृषभ चौधरी यांना विभागून देण्यात आले. नंदिनी रविश्वर आणि प्रणाली पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकास रुपये १२ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये १० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास ८ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप होते.

‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन, ‘ गतीमान शिक्षण पध्दती २०२० ‘,‘ महामारीनंतरचे शिक्षण व उद्योग क्षेत्र, ‘ आपल्या जीवनात पुस्तकांचे महत्व ‘, ‘प्रेम हे द्वेषापेक्षा शक्तीशाली आहे, ‘ शिक्षणात अध्यात्माची गरज,’ आपल्या जीवनात पुस्तकांचे महत्व, ‘सोशल मीडिया : वरदान की शाप’ ‘हे स्पर्धेचे विषय होते.या स्पर्धेसाठी संयोजन समिती सदस्य डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ प्रवीण माने,डॉ विजय फाळके, डॉ.हेमा मिरजी, स्वप्नील थोरात, प्रतिमा गुंड यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क नव्हते.
