Saturday, January 28, 2023
Home खास न्यूज तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढ, वेळापत्रकात बदल -NNL

तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढ, वेळापत्रकात बदल -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढविण्यात आले आहे, तसेच या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे –

गाडी क्रमांक 07637 तिरुपती ते श्री साईनगर शिर्डी विशेष गाडी दिनांक 22 आणि 29 जानेवारी तसेच 5, 12, 19 आणि 26 फेब्रुवारी, 2023 दरम्यान तिरुपती येथून दर रविवारी सकाळी 05.30 वाजता सुटेल आणि रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, बिदर, परळी वैजनाथ, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सोमवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07638 श्री साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 जानेवारी तसेच 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी, 2023 दरम्यान श्री साईनगर शिर्डी येथून दर सोमवारी रात्री 19.35 वाजता सुटेल आणि अंकाई, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी, परळी वैजनाथ, बिदर, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी रात्री 23.55 वाजता पोहोचेल.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!