
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पत्रकार आणि पोलीस यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनी आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून निर्भीडपणे लिखाण करावे तो पत्रकारांचा अधिकार आहे असे मत रामतिर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी व्यक्त केले.


वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने नरसी येथील पोलीस चौकीत पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजीत केला होता .


याप्रसंगी स.पो.नि. संकेत दिघे. जेष्ठ पत्रकार गंगाधर पा. भिलवंडे. मनोहर तेलंग. तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार. लक्ष्मण बर्गे.गंगाधर गंगासागरे. गोविंद टोकलवाड. सुभाष पेरकेवार.यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक संकेत दिघे म्हणाले कि मी येथील भागामध्ये सेवा बजावत असताना व पत्रकारांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीन असे मत व्यक्त केले. यावेळी, आनंदा सुर्यवंशी. सय्यद अजिम ,श्याम गायकवाड, परमेश्वर जाधव, धम्मदिप भद्रे.गणेश कंदुरके.आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

