हदगाव। हदगाव येथील पत्रकार गजानन जिदेवार यांनी दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताने पित्त खवळलेल्या नायगाव तालुक्यातील एका अवैद्य मुरूम उत्खनन करून साठा करणाऱ्या ठेकेदाराने चक्क पत्रकाराला धमकी वजा वक्तव्य करून अश्लील शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी हदगाव येथील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हदगाव तालुक्यातील शेतमजूरवाडी तामसा येथील तामसा ते उमरी रस्त्यालगत असणाऱ्या अवैद्य मुरूम प्रकरणाची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली. ती बातमी सोशल मीडियाच्या ( व्हॉट्स ॲप ग्रुप ) माध्यमावर टाकण्यात आली. आदर बातमीचे कात्रण नायगाव येथील पत्रकार ग्रुपवर टाकण्यात आली होती. यात अवैध मुरूम उत्खनन करून साठा करणाऱ्या ठेकेदाराने ती बातमी पाहिली व ‘ तुला पैसे दिले नसल्याने तु बातमी लावली’ म्हणून त्या ग्रुपवर प्रतिक्रिया दिली.
म्हणून पत्रकार गजानन जिद्देवार यांनी ग्रुपवर प्रतिक्रिया न देता फोन करून विचारणा केली असता. त्या मुरूम माफियाने तू बातमी का लावली म्हणून अश्लील भाषेत शिवागळ करून ‘मीच तो मुरूम टाकला ‘ आणि तू बातमी घेतो…. म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून ‘ तुला पाहतो तुला काय करायचे आहे ते कर ‘ म्हणून धमकी देण्यात आली. ठेकेदार साईनाथ देशमुख रा. नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांनी बातमी का लावली म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
म्हणून धमकी देणाऱ्या संबंधित साईनाथ देशमुख यांच्या विरोधात हदगाव येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीची तक्रार उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार तहसील कार्यालय हदगाव यांच्याकडे देण्यात आली. यावेळी पत्रकार पंडितराव पतंगे, कमलाकर बिरादार, संजय राहुलवार, भगवान शेळके, नंदकिशोर सोनमनकर, विकास राठोड, धर्मराज गायकवाड, गजानन सुकापुरे, महेंद्र धोंगडे, प्राध्यापक राजेश राऊत, एस एस खांडेकर, अभिजीत देवसरकर ,दयानंद कदम, राष्ट्रदीप वाढवे, केदार दायमा, प्रवीण दुधारे ,शेख शहबाज, गजानन गिरी, मारुती काकडे इत्यादी पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते.