
नांदेड| नांदेड जिल्ह्यात व शहरातील सुप्रसिद्ध रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक आणि हिमायतनगर चे सुपुत्र तज्ज्ञ डॉक्टर डॉ.निलेश जयराम बास्टेवाड हे आपल्या जन्मभूमीच्या सेवेच्या ऋुणत्वातील सेवेच्या भावनेने मागील २०१८ सालापासून आपली जन्मभूमी असलेल्या हिमायतनगर येथे आरोग्य शिबीर घेतात. यात हॉस्पिटल्स् ची टिम प्रत्येक महीन्याच्या दुसऱ्या बुधवारी हिमायतनगरात स्वखर्चाने जाऊन तेथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करते. या शिबीरात सर्वच प्रकारच्या आजारांचे रोगनिदान व प्रथोमोपचार करण्यात येतात अशी माहीती आयोजक तथा रेणुकाई हॉस्पिटल्स् चे संचालक डॉ.निलेश बास्टेवाड यांनी दिली.


डॉ.निलेश हे स्वतः एमबीबीएस, एमडी मेडीसीन असून त्यांचे पुढील शिक्षण हे ह्दयरोग व मधुमेह निदान व उपचार यात झाले आहे त्यांच्याबरोबर डॉ हेमंत लखमावाड एमबीबीएस, एमडी मेडीसीन हे ही एमबीबीएस, एमडी मेडीसीन तसेच डॉ.गजानन अल्पेवाड असलेले तज्ञ शिवाय महीला रुग्णांसाठी डॉ.छाया जी. गवले याही एमबीबीएस, एमडी मेडीसीन असलेल्या तज्ञ ह्दयरोग व मधुमेह रुग्णांसाठी निदान,उपचार व मार्गदर्शन करत आहेत ..


यासोबतच डॉ.विलास मुसळे एमबीबीएस, एमएस आर्थो हे अस्थीरोग व मणका विकार तज्ञ विविध प्रकारच्या हाड व सांध्या संबधीच्या आजारांवर निदान व उपचार करत असतात याशिवाय सदरील शिबीरासाठी रेणुकाईची तज्ञ टिम तसेच आरोग्यसेवक सोबत असतात अशी माहीती डॉ.निलेश बास्टेवाड यांनी दिली.


हिमायतनगरात घेण्यात येणाऱ्या दर महीन्याच्या प्रत्येक बुधवारी असलेल्या या आरोग्य तपासणी शिबीराची वेळ ही सकाळी ११ ते :सायंकाळी १ अशी असते या शिबीरात ह्दयविकार , एक्सीडेंट, मुतखडा उपचार व शस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंड कॅन्सर, मूत्र नलिकेमध्ये बाधा असण,•किडनीवर सूज येणे म्हणजेच प्रोस्टेट, पुरुष ग्रंथी आजार, जनरल सर्जरी, रक्तदाब व रक्ताच्या सर्व प्रकारचे आजाराचे निदान व उपचार, दमा,मेंदूज्वर, थायरॉईड, मधुमेह, विषबाधा व सर्पदंश रुग्णांचे निदान व उपचार.

अस्थीरोग निदान व उपचार, गुडघ्याचे आजार व मणक्याचे आजार, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर अशा विविध व्याधी व आजार यावर रेणुकाई हॉस्पिटलची टीम हिमायतनगर शहरात सेवा देते तसेच या शिबीराची नोंदणी संपूर्ण महीनाभर सुरू असते त्यासाठी रेणुकाई हॉस्पिटल्स् चे जनसंपर्क अधिकारी श्री धम्मानंद ढवळे किंवा विनोद मेडीकल अथवा डॉक्टर्स व डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष हिमायतनगर यांना संपर्क साधावा असे आवाहन रेणुकाई हॉस्पिटल्स् च्या वतीने करण्यात आले आहे …

अधिक माहीतीसाठी संपर्क — हिमायतनगर शहरामध्ये दिनांक 11-01-2023 रोजी येत आहेत, स्थळ: विनोद मेडिकल, हिमायतनगर, जनसंपर्क अधिकारी: ढवळे डी. के. Mo.no 9767284883