
नविन नांदेड। सायबर क्राईमच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून सायबर क्राईम संदर्भात सर्व विध्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी नांदेड पोलीस एमकेसीएल व पांढरे इन्फोटेक यांच्या संयुक्त विध्यमाने सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.


स्मार्ट फोन मुळे इंटरनेटचा वापर अधिक होत आहे. महिलांसह लहान मुलेही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर सर्वधिक करत आहेत. याच इंटरनेट च्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीही मोठया प्रमाणात वाढली आहे. आर्थिक फसवणूक, अश्लील चित्र – फोटो च्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सायबर फसवणुकीची माहिती मिळावी यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. एमकेसीएलचे मुकेश अडचित्रे यांनी उपस्थिताना आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग व इतर एप्लीकेशनच्या माध्यमातून होणारी फसवणूक याची माहिती दिली. सायबर क्राईम पासून दूर राहण्यासाठी विध्यार्थ्यानी मोबाईल वापरताना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


वसंतराव नाईक महाविद्यालचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. एन. पि. दिंडे होते. यावेळी पांढरे इन्फोटेक चे पांढरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. झांबरे यांनी तर आभार प्रा. नंदिनी सुधळकर यांनी मानले. वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. संतोष शिंदे, प्रा.डॉ.ऊत्तम कानवटे यांची उपस्थिती होती. प्रा. ब्रदवाल, प्रा. कोतवाल,प्रा. मुस्तापुरे, प्रा. देवकत्ते, प्रा. जायदे ,प्रा.शेख यांची उपस्थिती होती. कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

