
नविन नांदेड। वैश्विक स्तरावर स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण करायची असेल तर हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन पीपल्स महाविद्यालयाचे प्रो . डॉ. भगवान जाधव यांनी केले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार हे होते तर उपप्राचार्य डॉ.व्ही. आर . राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व हिंदी दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो . डॉ. भगवान जाधव बोलत होते हिंदी साहित्याची एवढी व्यापकता आहे की जगातील अनेक देशात हिंदीचा प्रचार प्रसार हा वेगाने होत आहे. कला साहित्य संस्कृती आणि राजकीय स्तरावर हिंदी चे महत्व पटवून सांगितले.


अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी जागतिक स्तरावर धबधबा निर्माण करायचा असेल आणि जगाच्या बाजारपेठेत टिकायचे असेल तर हिंदी भाषेचे सृजन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभाग अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मोरे आर .डी. यांनी केले जागतिक स्तरावर हिंदी विश्व संमेलनाचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पूनम शर्मा यांनी केले , तर प्रा. निराली काळगापूरे यांनी आभार मानले.


या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. पी. एल. चव्हाण , डॉ. पी.बी. बिराजदार , डॉ.व्यंकटेश देशमुख , डॉ. डी. एस. पालीमकर , डॉ.एम. के. झरे डॉ. आर.एम. कागणे ,डॉ.नागेश कांबळे ,डॉ.यु . एस. कानवटे , डॉ. एस.बी शिंदे , डॉ. एस बी. गिरे डॉ. एस. जी. मोरे , डॉ. रंजना अडकिने ,डॉ. शोभा वाळूकर , डॉ. एल. व्ही खरात , डॉ.निगमपल्ले प्रा.एस. पी. शिंदे , प्रा.कपिल हिंगोले , डॉ. एन. आर. कांबळे , डॉ. इजळकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
