
लोहा| परिस्थिती वर पाय ठेवून यशाला गवसणी घालावी त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ एका क्षेत्रात नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करावे.कधी सुस्वर गायन तर कधी धीरगंभीर होत विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन शिक्षक तज्ज्ञ गणपत चव्हाण यांनी केले


जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षा पासून सावित्री ते जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ जन्मोत्सव घेतला जातो यंदा या कार्यक्रमातील तिसरे पुष्प प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ गणपत चव्हाण यांनी गुंफले यात पाहिले पुष्प प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले यांनी तर दुसरे पुष्प शिवश्री रमेश पवार यांनी गुंफले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार तर व्यसपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण , प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले यांनी उपस्थिती होती. शिक्षक तज्ज्ञ गणपत चव्हाण यांनी शिक्षकानी नेहमीच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला आहे अलीकडच्या काळात ठराविक क्षेत्रात आपला विद्यार्थी पारंगत व्हावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.


पण विद्यार्थ्यांत सर्वगुण असायला हवेत .तो सर्वच क्षेत्रात पारंगत असायला हवा .तसेच त्यांनी सध्य सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करताना राष्ट्रमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गुंफण करताना त्याचे विचार आज आत्मसात करण्याची गरज आहे असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यां समोर प्रसंगानुरूप सुस्वर गाण्याच्या चालीवर कविता म्हणून दाखविल्या हसवत आणि खेळत त्यांनी अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी जिजाऊ महोत्सवाची माहिती दिली १२ जानेवारी रोजी शहरातून भव्य शोभा यात्रा निघणार आहे असे सांगितले अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी केला. संचलन व पाहुण्यांचा परिचय आर आर पिठ्ठलवाड यांनी केले यावेळी बालाजी गवाले , दिलीप काहळेकर, एस ई पवार, व्ही एस गुद्धे, हरिहर धुतमल , आर आर पारेकर, एस आर शेटे, श्रीमती आढाव, सौ मीना काळकेकर , व्यंकट पवार, श्रीमती खरात यांची उपस्थिती होती.
