Saturday, January 28, 2023
Home कृषी शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा -NNL

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| जिल्ह्यास जानेवारी महिण्यात युरिया खताची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात 15 हजार मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आजच्या स्थितीला आयपीएल कंपनीचे 1800 मे. टन व नागार्जूना कंपनीच्या 2200 मे. टनच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरीत होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .

आपल्या जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दाळवर्गीय हरभरा पिकास युरिया खताचा वापर टाळावा जेणे करुन पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही व खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल.

अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल. पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमीनीची पोत टाळता येईल व पिकांना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल. 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!