
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या चार वर्षाहून अधिकच्या काळापासून सुरू असलेल्या हिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहनधारक नागरिकांना चिखलाचा सामना करावा लागला होता. आता थेट थंडीच्या काळात धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, वाहने चालविताना वाहनांचे नुकसान तर होतच आहे. मात्र पाठीच्या आणि मणक्याच्या त्रासाचा सामना दुचाकी चालक नागरिकांना करावा लागतो आहे. या बाबीकडे संबंधित विभागाने व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी लक्ष देऊन तात्काळ हिमायतनगर शहरातील रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना संबंधितास द्याव्यात. अर्धवट व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारचे नाव काळ्या यादीत टाकून दुभाजकासह उड्डाणपूल करून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी रस्त्याच्या समस्येने हैराण झालेल्या वाहनधार, प्रवाशी, नागरिक, शेतकरी वर्गातून केली जात आहे.


हिमायतनगर शहरातून जात असलेली राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या ४ वर्षांपासून सुरु असलेल्या या कामाची संत गती यामुळे अजूनही हा रस्ता अर्धवट आहे. एव्हडेच नाहीतर अर्ध्या शहरातून एका बाजूने रस्ता करण्यात आला. तर तहसील कार्यालयपर्यंतचा अर्धा रस्ता पूर्ण होणे बाकी आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि आता रस्त्यावर धुळीचा लोट दिसत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असताना देखील रस्त्याच्या कामाची देखरेख करणारे अभियंता देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिवसाआड होत असलेल्या छोटे मोठे अपघाताच्या घटनेनंतर विकासप्रेमी जनतेतून केला जात आहे.


या रस्त्याला मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने सब ठेकेदार नेमून या रत्स्याचे काम नाशिकच्या भाईजी नामक एका ठेकदारांमार्फत सुरु करून घेतले. या ठेकेदारने रस्त्याच्या कामाची गुणवत्तेची पुरती वाट लावली. आणि अनेक थेईकानी पुलाचे कामे पूर्ण ना करता अपघाताला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या चार वर्षाच्या काळात ५ ते ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हि वस्तुस्थिती असताना देखील मंत्री महोदयांचे या रास्ता कामाकडे दुर्लक्ष का होतेय असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम थातुर माथूर कुठे रात्रीला- अपरात्रीला करून रस्त्याच्या कंची पुरती वाट लावली आहे. त्यामुळे गुणवत्ता ढसाळांची असून, या रस्त्याचे उदघाटन होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी या रस्त्याला मोठं मोठ्या भेगा पडलेल्या पाहावयास मिळत आहेत.


हा सर्व प्रकार राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आणि रस्त्याची देखरेख करणाऱ्या सबंधित अभियंत्याचे ठेकेदाराला मिळणारे अभय यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आटा तर गेल्या सह महिन्यापासून शहरातील रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन ठेकराने नागरिकाच्या जीवाशी खेळ मांडला असल्याचे दिसते आहे. पावसाळ्यात चिखलाचे आणि हिवाळा – उन्हाळ्यात धुळीच्या लोटाचा सामान वाहनधारक, प्रवाशी, नागरिक शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. एव्हडेच नाहीतर ठेकेदाराने या रस्त्यात मोठी हेराफेरी केली असून, हिमायतनगर शहरातील रत्स्याची रुंदी चक्क १० ते १५ फुटाणे कमी करून चक्क शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरातून जात असलेल्या रत्स्यातून चकाकी डिव्हायडर देखील गायब केला आहे. यामुले अपघाताचे प्रमाण वाढले असून, भविष्यात दुभाजक नसल्यामुळे हिमायतनगर शहर व इतर रस्त्याच्या गाव स्टोपेजवर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्मण झाली आहे.

अश्या प्रकारे निकृष्ठ व मनमानी पद्धतीने काम अर्धवट ठेऊन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या ठेकेदारचे नाव काळ्या यादीत टाकून यानंतर कुठलेही काम या कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात येऊ नये. नवीन ठेकेदारास या अर्धवट रस्त्याचे काम देऊन रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, आणि जनतेला होणाऱ्या या अडचण व आरोग्याच्या समस्येपासून सुटका द्यावी अशी मागणी विकास प्रेमी जनतेतून केली जात आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून आतापर्यंत अनेक राजकीय आजी-माजी नेत्यांनी आंदोलने केली, निवेदन दिले, अनेक वर्तमानपत्र व इलेकंट्रोनिक्स मीडियावर प्रसिद्ध झाले. मात्र याचा कोणताही फरक संबंधित ठेकेदारावर झाला नसल्याने हिमायतनगर शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. संबंधित ठेकेदार मंत्र्याच्या जवळचा असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट आणि मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. हा आरोप खोटा ठरविण्यासाठी अर्धवट रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे आणि शहरातील रस्त्यामध्ये दुभाजक व उड्डाणपूल करून शहराच्या विकासाला चालना देऊन भविष्यात होणारे अपघात टाळण्याबरोबर शहराच्या वैभवात भर पाडावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.