
नांदेड। मागील वीस वर्षापासून नांदेड येथे अमरसेवा आश्रम सेवा ट्रस्टच्या माध्यमातून कर्करोगावर संशोधन व उपचार सुरू आहेत. असाध्य समजल्या जाणाऱ्या कर्करोगाच्या सुमारे 32 रुग्णांना अमरजीतसिंघ गिल यांनी रोगमुक्त केले आहे. याबाबत त्यांनी योगगुरु रामदेवबाबा यांच्याशी संवाद साधून सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे भविष्यात कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे.


सिख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंघ महाराजांच्या चरणांनी पावन झालेल्या गुरुद्वारा परिसरातील अमरसेवा आश्रम ट्रस्टच्या स. अमरजीतसिंघ यांनी मागील 20 वर्षापासून कर्करोगावर उपचार व संशोधन केले आहे. त्यांच्या उपचाराबाबत योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी संपर्क साधून सकारात्मक चर्चा केली आहे. अमर सेवा आश्रम ट्रस्ट येथे अमरजीतसिंघ गिल यांच्याकडे उपचारासाठी दररोज सकाळी ८ ते १० च्या दरम्यान अनेक रुग्णांची रांग लागलेली असते. त्यांनी आजपर्यंत ब्रेन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर , आतड्यांचा कॅन्सर, बोन कॅन्सर, मुख कर्करोगावर उपचार करून अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे.


आयुर्वेद उपचारांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी देऊन त्याची सिद्धता नोंदविणारे योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी अमरसेवा आश्रम ट्रस्टचे अमरजीतसिंघ यांनी संवाद साधून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याने कर्करोगाबाबत भविष्यामध्ये मोठे संशोधन होऊन त्याबाबत रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे तज्ञ जाणकाराकडून मत व्यक्त केल्या जात आहे.

