
नांदेड। डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी आयटीएम सभागृह येथे करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. अशी माहिती आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.


डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शहरातील आयटीएम सभागृह येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर, युवानेते नरेंद्र चव्हाण, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.


स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान हा स्पर्धेचा विषय आहे. ही स्पर्धा १५ वर्षांपासून पुढील वयोगटातील सर्वांसाठी खुली असणार आहे. सहभाग नोंदणी प्रक्रिया दि. २० जानेवारी पासून सुरु होणार आहे. अशी माहिती आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.

