
लोहा| सावली जशी क्षणिक तसेच जीवन सुद्धा क्षणिक असते त्यामुळे जीवनाचा भरपूर फायदा घेतला पाहिजे .काम-क्रोध-लोभ हे जीवनातील दोष आहेत. यशाच्या शिखरावर जायचं असेल तर अनुशासन- विनम्रता- परोपकार-प्रामाणिकता-अभ्यास या पंचसूत्रीचा वापर करा जीवन यशस्वी होईल. यश हमखास मिळेल असे मार्गदर्शन हभप आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडीकर यांनी केले.


सावित्री ते जिजाऊ जयंती निमित्त शिवछत्रपती विद्यालय लोहा येथे जिजाऊ जन्मोत्सव २०२३ साजरा करण्यात आले. यात हभप आत्माराम महाराज रायवाडीकर , शिक्षिका श्रीमती एस पी एंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुल्तानखान, सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण हे उपस्थित होते.


हभप आत्माराम महाराज रामज्वर रायवाडीकार यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर जायचे असेल तर अनुशासन, विनम्रता परोपकार, प्रामाणिकता अभ्यास या पाच सूत्रीचा उपयोग करा म्हणजे जीवनात यश मिळते असं मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग सोदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले.


शिक्षिका सौ एंगडे यांनी जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.प्रास्ताविक एच जी पवार यांनी केले तर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केले त्यांनी जिजाऊ जन्मोत्सव व शोभा यात्रा बाबत माहिती दिली संचलन आर आर पिठ्ठलवाड यांनी केले .आभार हरिभाऊ चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी बी एन गवाले, दिलीप काहलेकर , एस एच शेख, एस ई पवार, व्ही एस गुद्धे,राहुल पारेकर ,आर आर पिठ्ठलवाड, हरिहर धुतमल, एस आर शेटे, महंमद अखिल , अजमल सय्यद , सुरया बेगम, श्रीमती आढाव, मीनाताई काळकेकर -पवार, विठ्ठल वडजे, व्यंकट पवार, श्रीमती खरात यासह सर्व कर्मचारी
