
नांदेड। महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना निर्मित महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका- 2023 चा भव्य प्रकाशन सोहळा दि. 9 जानेवारी 2023 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता महर्षी मार्कंडेय मंदिर गंगाचाळ नांदेड येथे सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्त्व श्री तुळशीदासजी भुसेवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा सम्पन्न झाला.


या प्रकाशन सोहळ्याला श्री श्रीधर सुंकुरवार गौरव अध्यक्ष अ. भा.प. संघम, श्री प्रल्हाद सुरकूटवार उपाध्यक्ष अ. भा. प. संघम, श्री सुभाष बल्लेवार सचिव अ. भा. प.संघम,श्री गोविंदभाऊ कोकुलवार अध्यक्ष मराठवाडा पद्मशाली युवक संघटना, श्री जगन्नाथ बिंगेवार अध्यक्ष मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम, श्री विजय गड्डम उपाध्यक्ष मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम,श्री नंदकिशोर अडकटलवार नांदेड जिल्हाध्यक्ष मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम, नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे लोकप्रिय नगरसेवक श्री राजुभाऊ यन्नम, श्री नागनाथ गड्डम , श्री नागेश कोकुलवार , श्री व्यंकटेश जिंदम भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष नांदेड, श्री प्रकाश बोगा सहसचिव मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम, मराठवाडा पद्मशाली युवक संघटना सचिव श्री सत्यजीत टिप्रेसवार, मराठवाडा पद्मशाली युवक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष श्री संग्राम निलपत्रेवार, श्री बजरंग नागलवार मराठवाडा पद्मशाली युवक संघटना जिल्हा सचिव नांदेड, श्री सत्यानंद शिवरात्री संचालक मार्कंडेय बँक नांदेड, श्री उमेश कोकुलवार, श्री धनंजय गुम्मलवार, श्री संतोष गुम्मलवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित सम्पन्न झाला. प्रास्ताविकेत म.रा. पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नागभूषण दुर्गम यांनी मार्कंडेय दिनदर्शिका 2014 पासून सातत्य राखुन सतत 10 वर्षे प्रकाशित करण्यास समाजबांधवाणी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. उत्कृष्ट दिनदर्शिका डिझाईनिंग केल्याबद्दल श्री रॅपका प्रभाकर सत्यया, श्री रॅपका कृष्णा सत्यया साईकृपा ग्राफिक्स नांदेड या वर्षीचे दिनदर्शिका प्रमुख जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


या प्रकाशन सोहळ्याला नांदेड उत्तर पद्मशाली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष मल्लेश बल्ला,विजय वड्डेपल्ली, संतोष गुंडेटवार, नरसिंग गुर्रम, गणेश भुसा, नरसिमलु वंगावार, गणेश कोकुलवार,उमेश कोकुलवार, अण्णा अनलदास, गजानन वासमवार, भूमाजी मामीडवार,संजय टिप्रेसवार, प्रभूदास बत्तीन, नरसिंग बोगा फोटोग्राफर, बूरला पेंटय्या,मेतकू विश्वनाथ,अनिल गाजूला,गणेश पोला, बोगा बालकिशन, बोटला राघवेंद्र, जिंदम प्रकाश,यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. सूत्र संचलन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार तर आभार उपाध्यक्ष श्री शंकरराव कुंटुरकर यांनी मांडले.या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय अण्णा वड्डेपली, गणेश भुसा, नरसिंग गुर्र्म, संतोष गुडेटवर,।मलेश बल्ला, नर्सिमलू वंगावार,गणेश कोकुलवार,गणेश पोला,संतोष गुमलवार, गजानन वासमवार इत्यादिसह कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले

