
राष्ट्रीय युवक महोत्सवसाठी स्वारातीमवि नांदेडचा संघ हुबळी कर्नाटक येथे रवाना -NNL

अर्धापूर। 26 वा राष्ट्रीय युवक महोत्सव हुबळी -धारवाड कर्नाटक येथे दिनांक 12 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत संपन्न होत आहे.
या महोत्सवाचे उदघाटन स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी म्हणजेच 12 जानेवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.या प्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर,कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. आर.बोंमई यांची उपस्थिती असणार आहे.
या युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा संघ हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संघ रवाना झाला आहे.
संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले,प्र-कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन ,राष्ट्रीय सेवा योजना चे रिजिनल डायरेक्टर महाराष्ट्र, पुणे येथील डी. कार्तिगेयन , महाराष्ट्र राज्याचे राज्य संपर्क अधिकारी – विशेष कार्य अधिकारी तथा डॉ.प्रशांतकुमार वनंजे ,कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे,राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.मल्लिकार्जुन करजगी यांनी शुभेच्छा दिल्या. या संघामध्ये महाराष्ट्र चे संघव्यवस्थापक म्हणून प्रा रघुनाथ शेटे व 6 मुली आणि 5 मुल असे एकूण 12जनांचा संघ रवाना झाला आहे.