
नांदेड। नायगांव तालुक्यातील नर्सीच्या तब्बल १३ अंगणवाडी केंद्राना टी. एच.आर.व गरम ताजा आहार पुरवठा करण्याचे कंत्राट एकाच महिला बचत गटास दिल्याने अन्यायग्रस्त अन्य महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयाची संभाव्य उपासमार टाळावी यासाठी आज नांदेड येथे आलेल्या औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुरेश बेदमुधा यांची सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भवरे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली व त्यांच्यासह जिल्हा प्रशासनाला आपल्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याचे साकडे घातले.


अधिक माहिती अशी की, नरसी येथे १३ अंगणवाडी केंद्र असून त्याठिकाणी काही महिला बचत गट गेले १० ते १५ वर्षापासून शासन आदेशानुसार टी एच आर व गरम ताजा आहार पुरवठा करतात मात्र सदरचा पुरवठा करण्याचे निविदा प्रक्रिया करून ते कंत्राट मोहम्मद मुस्तफा महिला बचत गट नरसी यांना पात्र ठरल्याने देण्यात येत आहे म्हणून आपल्याकडील काम येत्या दिनांक १६ जानेवारी पासून बंद करावे असे आदेश बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक व बाल विकास सेवा योजना प्रकल्प नायगांव यांनी तोंडी दिले याबाबत दाद मागितली असता त्यावर चौकशी होणे गरजेचे होते मात्र त्याऐवजी त्यांनी तसेच आदेश पोस्टाद्वारे पाठविले यामुळे आपल्यावर अन्याय झाला असल्याची भावना अन्य महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


परंतु न्याय मिळत नाही आणि सदर काम गेले अनेक वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली तरी प्राधान्य का नाही सोबतच या प्रक्रिया बाबत माहिती नाही केवळ आपल्या अशिक्षित पणाचा फायदा उठवीत ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबून आम्हाला दूर केले त्यामुळे आमच्या कुटुंबियांवर उपासमार ओढवली जाणार आहे त्यासाठी सदरच्या निविदा प्रक्रिया बाबतची उचास्तरिय चौकशी करून ती प्रक्रिया रद्द करून नव्यानं पारदर्शक पणे घ्यावी त्यात यापूर्वी काम करीत आहेत असे महिला बचत गट यांना प्राधान्य द्यावे व सदरची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू बचत गटांना पूर्ववत काम करू द्यावे अन्यधा येत्या १३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार अन्यायग्रस्त महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून दिले.


दरम्यान आज नांदेड जिल्हा परिषद येथे औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभाग उपायुक्त सुरेश बेदमुथा आले असताना त्यांचे समवेत सामजिक कार्यकर्ते तथा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे व यशवंत थोरात यानी या अन्यायग्रस्त महिला सोबत चर्चा घडवून आणली त्यांनीही याबाबत स्वतः लक्ष देवू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांची उपस्थिती होती.
तसेच,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना याबाबत माहिती देवू असे त्यांचे कार्यालयातील गृह विभागाचे नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी शिष्टमंडळास सांगितले.

या निवेदनावर नरसी येथील समता महिला बचत गट,एकता महिला बचत गट,संघर्ष महिला बचत गट, इंदिरा महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, माधवी महिला बचत गट, साईबाबा महिला बचत गट आदी महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
