
उस्माननगर, माणिक भिसे। मागील अनेक दिवसांपासून उस्माननगर ता.कंधार परिसरातील वातावरणात बदल झाला, असून तेरा सभासद असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबी थंडीत निवडणुकीची गर्मी दिसून येत आहे.


नांदेड जिल्ह्यासह तालुक्याचे लक्ष असलेल्या उस्माननगर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीची रणधुमाळी गुलाबी थंडीत सुरु झाली असून दिग्गज कार्यकर्त्यांची व नेत्यांची बैठका वर बैठका घेतल्या जात आहेत.


उस्माननगर येथील सोसायटी निवडणुकीची धामधूम दि.२९ डिसेंबर रोजी पासुन प्रक्रीया सुरू झाली .,असून दि.४ जानेवारी २०२३ रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.या सोसायटीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ४९ जनांनी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.


त्यानंतर ५ जानेवारी रोजी नामांकन पत्र छाननीत एक अर्ज बाद ठरला.त्यामुळे आता ४८ नामांकन पत्र असून येणाऱ्या २० जानेवारीला नामांकन पत्र उचलण्याची तारीक असल्यामुळे दिग्गज, नेते, पुढारी , कार्यकर्ते कोणा कोणाचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायाचे याचे निराकरण करण्यासाठी बैठकावर बैठका बसत आहेत.कंधार तालुक्याचे नेहमी लक्ष वेधून घेणारी आणि अनेक उमेदवारांचे अस्तित्व नाकारणारी उस्माननगर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत भाजपप्रणीत ,व काॅग्रेसप्रणीत दोन गटाने नामांकन पत्र दाखल केले आहेत.

या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील गटा गटाचे राजकारण हे भल्या भल्याचे गणित बिघडीत असते.काॅग्रेस प्रणीत एकाच गटातील कार्यकर्त्यांनी पुढ येऊन एकमेकांना शह देण्यासाठी विरोध केला जात असल्याचे बोलल्या जात आहे.मागील वीस दिवसांपासून उस्माननगर परिसरातील वातावरणात बदल झाल्याने गुलाबी थंडीत निवडणुकीची गर्मी दिसून येत आहे.कोणाचे वझे…. कोणाच्या खाद्यावर हे २० जानेवारी नंतर दिसून येईल.
