
नविन नांदेड। सिडको परिसरातील जिजाऊ सृष्टी येथे १२ जानेवारी रोजी परिसरातील सर्व सामाजिक, राजकीय पक्षासह संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ,यांच्या सह अनेकांनी अभिवादन करण्यात आले.


राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त सिडको परिसरातील जिजाऊ सृष्टी येथे रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती,१२ जानेवारी रोजी सकाळी जिजाऊ सृष्टी येथे सकाळी राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे,भि.ना.गायकवाड, संतोष कांचनगिरे,प्रसेनजित वाघमारे,किशन रावणगावकर, यांनी तर वंचित बहुजन आघाडीच्या महानगर दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, नंदकुमार गचे, महेश निलकंठवार,दिपक जोंधळे,तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सिडको शहर उपशहरप्रमुख पपू गायकवाड, युवा नेते राजू लांडगे, संभाजी ब्रिगेड चे लोकसभा प्रमुख संकेत पाटील,दिपक भरकड, मराठा सेवा संघ सिडको अध्यक्ष त्र्यंबक कदम, साहेबराव गाढे, गोविंदराव मजरे,वंसत कदम, ज्योती संकेत पाटील, रत्नमाला जाधव,कमल हिवराळे, कौशल्या कदम, विजयाताई गोडघासे यांच्या सह राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , वृत्तपत्र विक्रेते पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते, महिला,युवक विद्यार्थी यांनी अभिवादन केले.


सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने अभिवादन…
नविन नांदेड. सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने सिडको येथील सेटंर येथे १२ जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.

ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस अंमलदार शिवानंंद कानगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार डि.गा.पाटील, लोकमत वितरणचे संजयकुमार गायकवाड, वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम, बालाजी सुताडे, महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते मदनसिंह चोहाण, दौलतराव कदम, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते.
