
नांदेड। नांदेड मधील एक जुनी,नावाजलेली व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून प्रतिभा निकेतन हायस्कूल, श्रीनगर ,नांदेडची ओळख आहे. या विद्यालयातून अनेक विद्यार्थी देशप्रदेशामध्ये शिक्षण घेऊन आज आपल्या देशाचे नाव उज्वल करीत आहेत.अशाच या विद्यालयातून 22 वर्षांपूर्वी दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.


सर्व मित्रमैत्रिणीं एकत्र येत माझी शाळा व माझे शिक्षक म्हणून आजी-माजी गुरुजनांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. बालपणीचा काळ सुखाचा या युक्तिप्रमाणे बालपणातील आठवणींना उजळा देत अनेक माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. आतापर्यंतचे आपल्या जीवनातील अनुभव कथन, करीत असलेले कार्य व एकमेकांच्या सुखदुःखातील सहभाग याबाबतीतील अनुभवांना भावपूर्ण असा उजाळा देण्यात आला.


सदरील स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील मंत्रा रिसॉर्ट येथे दिनांक 07 व 08 जानेवारी रोजी या दोन दिवसात संपन्न करण्यात आले. यामध्ये 91 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या संमेलनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव,बेंगलूरू तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यातून माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंद दिलेला होता. देशभरात नोकरी व्यवसायानिमित्त विखुरलेले सर्व मित्र-मैत्रिणीं एकत्र भेटल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होते. उच्च पदावर असणारेही लहान मुलाप्रमाणे वावरत होते.


शाळेतील सवंगड्या सोबत केलेली मोजमती असो, कधी शिक्षकांनी केलेले कौतुक असो, तर कधी पाठीवर मिळालेला एखादा धम्मकलाडू असो, सर्वांगड्याच्या खोड्या असो, त्यामुळे पडलेला शिक्षकांचा पडलेला ओरडा असो, परीक्षेच्या काळात अवघड वाटलेली प्रश्नपत्रिका असो तर कधी उत्तम गुण मिळाल्यानंतर भांड्यात पडलेला जीव असो अशा अनेक जुन्या शालेय आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी हे स्नेहसंमेलन रंगवले आणि आपल्या जीवनातील विचार ,अनुभव एकमेकांना या ठिकाणी सांगितले तब्बल 22 वर्षांनी ही सवंगडी मंडळी एकत्र जमली होती. त्यामुळे याप्रसंगी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

या दोन दिवशी संमेलनात सर्वांनी धमाल केली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीचे व्यवस्थापन डॉ राजेश मुंडे, अनिरुद्ध निकते, तेजस ठोंबरे, डॉ. सचिन बिडवई, अक्षय औंढेकर, नचिकेत देशपांडे, प्रसाद मोटे तसेच नांदेड मधून सर्वांची प्रवास व्यवस्था गणेश बागडे,शशांक जोशी डॉ.शुभांगी पाटील,प्रसाद मोटे, किरण पांचाळ,गोविंद कन्नडकर,रुपेश आणि अमित कंठेवाड,गजानन उंबरकर यांनी पाहिले तर सदरील स्नेहसंमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख प्रमुख म्हणून रवी जाधव यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळी आहे….!!
