
नविन नांदेड। नरसिंह विद्या मंदिर प्रा.शाळा सिडको नांदेड येथे भारत स्काऊट गाईड च्या वतीने कब व बुलबुल तर्फे आनंदनगरी मेळावा ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.


खरी कमाई उपक्रमा अंतर्गत या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती,मेळाव्याचे उद्घाटन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रवि शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून भारत स्काऊट गाईड नांदेड च्या संघटक श्रीमती तांडे व श्रीमती वंदना एकुंडवार मुख्याध्यापिका नरसिंह विद्या मंदिर प्रा शाळा सिडको नांदेड ह्या होत्या.


सकाळी नऊ वाजता मेळाव्याचे उद्घाटन नंतर पालक व विद्यार्थी यांनी खाऊच्या स्टॉल वर विविध खाद्यपदार्थांची खरेदी करून मनमुराद आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वदे जी. टी.यांनी केले तर आभार क्षीरसागर जी.बी.यांनी आभार मानले.या कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

