Monday, February 6, 2023
Home नांदेड राज्य रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ -NNL

राज्य रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड|‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023’ चे उदघाटन प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी श्रीछत्रपती शिवाजी विदयालय सिडको संस्थेचे संस्थाचालक राजेश महागावे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे डॉ.महेमुद यांची उपस्थिती होती. यावेळी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली. अपघातामुळे अनेक कुटूंबे उध्दस्त झालेली आहेत.

याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये एक समिती नेमण्यात आलेली असून या समितीने प्रत्येक प्रत्येक वर्षी किमान 10 टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगितले. फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजून चालावे (Walk on Right) याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते एका नविन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. या नविन संकल्पनेची जनजागृती संपूर्ण जिल्हयामध्ये करण्यात येणार आहे. या राज्य रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल आवाड यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल डुब्बेवार यांनी मानले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाड, मनोज चव्हाण, गणेश तपकिरे, भरत गायकवाड, अभिजित कोळी व सहा.मोटार वाहन निरीक्षक धोंडीबा आवाड, अनिल टिळेकर, कज कंतेवार, डुब्बेवार लिपीक कर्मचारी, मुख्य लिपिक राजेश गाजुलवाड, रोहित कंधारकर, गजानन शिंदे, दिलीप गाडचेलवार, श्रीमती जयश्री वाघमारे, नरेश देवदे, क. लिपीक प्रदीप बिदरकर, संजय कोंगलवार, मोतिराम पोकले, छत्रपती शिवाजी विद्यालय सिडको येथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे पथक उपस्थित होते.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!