
लोहा| जय जिजाऊ.. जय शिवराय असा घोषणांनी लोहा शहर दुमदुमले…जुन्या शहरातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने जिजामाता शिक्षण संस्थे अंतर्गत शाळेने जिजामाता यांच्या प्रतिमेसह भव्य शोभा यात्रा शहरातून काढली. माजी आ रोहिदास चव्हाण माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, संचालिका वंदनाताई पवार व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही मिरवणूक निघाली. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व खाऊ वाटप केला.


जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लोहा व डॉ याकूबखान उर्दू प्रशाला यांचा वतीने जिजाऊ महोत्सव संस्थापक वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षा पासून हा महोत्सव साजरा करण्यात आला. शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माजी आ. रोहिदास चव्हाण, संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मुकदम, संचालिका वंदनाताई पवार, श्रीकांत पाटील पवार, नगरसेवक संभाजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहित्यीक शेषराव काहलेकर, शहराध्यक्ष युवराज वाघमारे, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण,सुधाकर पाटील पवार, नामदेव पाटील पवार, ज्ञानोबा माऊली पवार, मलकार्जुन अप्पा शेटे, भारत पवार, संजय मक्तेदार, संजय चव्हाण, श्रीराम पवार, प्रकाश पवार, मुख्याध्यापक दामोधर वडजे, मुख्याध्यापक हणमंत पवार, सुल्तानखान, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरीभाऊ चव्हाण, सौ टेकाळे मॅडम यासह मोठ्या संख्येने गावातील मान्यवर उपस्थित होते.


शहराच्या मुख्य रस्त्याने भव्य शोभा यात्रा जिजाऊ मातेच्या तैलचितासह निघाली भगवे फेटे परिधान व जिजाऊंच्या वेशभूषेतील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या शोभा यात्रेत आर आर पिठ्ठलवाड यांनी मिरवणुकीत धावते समालोचन केले. युवा नेते अविनाश पाटील पवार यांनी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते खाऊ वाटप केला. यावेळी नगरसेवक भास्कर पाटील पवार व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.


शोभा यात्रा काळात शहरात माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, नगरसेवक संभाजी चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख युवराज वाघमारे , नगरसेवक संदीप दमकोडावार, लक्ष्मीकांत बिडवई, महेंद्र लाभशेटवार दत्ताजी बतकुलवार, राजु महाजन, गुलजार साडी सेंटर, खोडवे मंडप डेकोरेशन, रज्जाक शेख, युवराज वाघमारे शहर प्रमुख शिवसेना, अंकुलवार किराणा, आसेफ किराणा, राजमुद्रा मोबाईल शॉपी, जयवंत कन्फेक्शनरी, ओमसाई हॉटेल, सोनी क्लॉथ सेंटर, अपना टि हाऊस, मातोश्री झेरॉक्स यांनी खाऊ वाटप केला. पारडी येथील प्रशालाचा लेझीम , प्रस्तुत शाळेचे टिपरे या शोभा यात्रेतील खास आकर्षक होते.
नगरपालिकेच्या वतीने भाजी मंडई येथे अभिवादन करण्यासाठी राजमाता जिजामाता यांचे प्रतिमा ठेवण्यात आली होती. वाजतगाजत अतिशय भव्यदिव्य असा जिजाऊ जन्मोत्सव जिजामाता शिक्षण संस्थे अंतर्गत शाळेने साजरा केला. मुख्याध्यापक व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
