
नांदेड| स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती श्री गुरुगोविंदसिंगजी पत्रकारिता महाविद्यालयात संपन्न झाली.


मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने आऊसाहेब अर्थात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच ‘कोणती गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या कमकुवत करते ती समजून त्यापासून दूर राहा’ अशी शिकवण देणारे थोर तत्त्वज्ञ तसेच पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा शिकवण पध्दतीचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावणारे थोर तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दोन्हीही प्रतिमेस श्री गुरुगोविंदसिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास कदम सर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


यावेळी कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक विलास वाळकीकर सर, प्रा. विपिन कदम सर, प्रा.संजय नरवाडे, प्रा.शारदा कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, रोहित माळी, आदित्य कुंटे,भारत सोनटक्के आदी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

